समीर वानखेडे यांना कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस संचालक समीर वानखेडे यांना अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करायला परवानगी दिली आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती एस जी डिगे यांच्या खंडपीठानं वानखेडे यांना कथित लाच देणाऱ्यावरही कारवाई करण्यात यावी, असं अतिरिक्त कारण नमूद करण्याची परवानगी दिली.

अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलावरचे सर्व आरोप वगळण्यासाठी वानखेडे आणि इतर चार जणांनी शाहरुख खान यांच्याकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ,सीबीआयनं केला आहे. सीबीआयला तोपर्यंत सुधारित याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश देत खंडपीठानं याचिकेची पुढची सुनावणी २० जुलै रोजी ठेवली आहे. वानखेडे यांना अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षणही न्यायालयानं २० तारखेपर्यंत वाढवलं ​​आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image