पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“स्वामी विवेकानंद यांचे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मरण करत आहे. त्यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक विचार आपल्याला बलशाली आणि गतिशील भारत निर्माण करण्यासाठी यापुढेही प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील. त्यांचे ऐक्य आणि बंधुत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  वचनबद्ध असंल्याचा आपण पुनरुच्चार करूया.”