१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काल भदोई इथं बातमीदारांना दिली. राम मंदिराच्या पहिल्या माळ्याचं काम या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होईल आणि डिसेंबर पर्यंत त्याची रंगरंगोटी पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं. पुढची हजारो वर्ष डागडुजीची गरज लागणार नाही, अश्या पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.