दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणाचे कॅग करणार विशेष ऑडिट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणातल्या कथित अनियमिततांचं विशेष लेखा परीक्षण कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापाल करणार आहे. याबाबत दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहीलं आहे. केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाची डागडुजी आणि नूतनीकरणाच्या कामावर सुमारे 45 कोटी रुपये खर्च झाल्याच्या बातम्या माध्यमांमधे प्रसिद्ध झाल्या होत्या.