व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे - जेपी नड्डा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भाजप दिल्ली युनिटच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ सरकारचे कार्यच नव्हे, तर देशातल्या राजकारणाची संस्कृतीही बदलली असून, मोदींनी अशी संस्कृती आणली आहे जिथे सामान्य घरातून आलेली कोणतीही व्यक्ती प्रधानमंत्री होऊ शकते असं नड्डा म्हणाले.

भाजप देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची कार्यालयं स्थापन करण्याचं काम करत आहे आणि आतापर्यंत ५०० हून अधिक पक्ष कार्यालयं कार्यरत असून, जवळपास १६६ कार्यालयं बांधली जात असल्याचं नड्डा यांनी सांगितल.