शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या परिषदेला दिलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी म्हटलंय की, किमान अंक आणि अक्षरओळख प्रसाराला भारताने प्राधान्य दिलं असून संघटनेतल्या इतर देशांनीही त्याचं महत्त्व मान्य केलं आहे. या उद्दिष्टासाठी कालबद्ध रीतीने येत्या २०३० वर्षापर्यंत काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. ईलर्निंग सारख्या आधुनिक तंत्राचा वापर शिक्षण प्रसारसाठी केला पाहिजे, असं सांगून त्यांनी स्वयंम या सरकारी उपक्रमाचा उल्लेख केला.