शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला.  शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरोग्याचा पुरस्कार, एकता आणि योगाचा संदेश जगभर नेण्यासाठी भारतीय समुदायाची  कटीबद्धता  या सांघिक योग सत्रातून अधोरेखित झाली.