मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी येत्या शनिवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरमधल्या परिस्थिती विषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमधे गेला महिना दीड-महिना मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असून, अशांतता आहे. गृहमंत्री शाह यांनी गेल्या महिन्यात प्रत्यक्ष मणिपूरमधे जाऊन पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं विविध गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मणिपूरमधल्या मैतेई जमातीला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे. त्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी गेल्या तीन मे रोजी आदिवासींनी मोर्चा आयोजित केला होता. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागून १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तर तीन हजारपेक्षा जास्त जखमी झाले होते.