जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा विकास हा शासकीय योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हजारो लोक एका छताखाली येऊन शासनाची सर्व कागदपत्रं, प्रमाणपत्र ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून मिळवत आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा विकास हा शासकीय योजनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात आज आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंचांच्या माध्यमातून गावं समृद्ध करण्यासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मागच्या काही वर्षात जळगाव जिल्ह्यात शासनानं राबवलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेतानाच जिल्ह्याच्या आगामी सिंचन प्रकल्पांसाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, राज्य मंत्रिमंडळातले काही सदस्य लव याप्रसंगी उपस्थित होते.