दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यानुसार येत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही पुरवणी परीक्षा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना उद्या सात जून ते १७ जून दरम्यान नियमित शुल्कासह आणि १७ ते २१ जून दरम्यान विलंब शुल्कासह हा अर्ज भरता येणार आहे.