केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग मध्ये जोरदार पावसामुळं केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य हवामान विभागानं नैनिताल, चंपावत पिठोरागड, बागेश्वर, देहराडून, तिहारी आणि पौडी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत केशरी बावट्याचा इशारा दिला आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांना पिवळ्या बावट्याचा इशारा देण्यात आला आहे.