पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आदिलाबाद - पंढरपूर आणि पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आदिलाबाद -पंढरपूर ही रेल्वे गाडी येत्या २८ तारखेला सकाळी ११ वाजता आदिलाबादहून सुटेल आणि २९ तारखेला सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी पंढरपुरला पोहोचेल. तर पंढरपूर - औरंगाबाद ही गाडी २९ तारखेला रात्री ११ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी पावणे दोन च्या सुमारास औरंगाबादला पोहचेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.