राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर - रामबाण विभागातला जैसवाल पूल पूर्ण झाला - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू- काश्मिर इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 च्या उधमपूर - रामबाण विभागातल्या चेनाब नदीवरील 2 मार्गिका असणारा जैसवाल पूल पूर्ण झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यामातून दिली. 118 मीटर लांब असणारा हा पूल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे. या पूलाच्या बांधकामासाठी 20 कोटींचा खर्च आल्याचं त्यांनी  सांगितलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार जम्मू - काश्मिरच्या रस्ते आणि महामार्ग विकासासाठी वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. जम्मू - काश्मिरच्या पायाभूत सुविधांमुळे केवळ आर्थिक विकासच नाही, तर पर्यटनाला देखील चालना मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.