जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड झाली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्य असलेल्या कार्यकारी मंडळानं बुधवारी माजी मास्टरकार्ड सीईओची अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली.  63 वर्षीय बंग यांची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या पदासाठी शिफारस केली होती. अजय बंग २ जून रोजी जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतील.