समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

 
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे माजी परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर आज सीबीआयनं छापा टाकला. वानखेडे यांच्यासह अन्य चौघांवरही सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खान क्रूझ  प्रकरणी  हा गुन्हा दाखल केला असून मुंबईसह दिल्ली, रांची,कानपुर, लखनौ, गोहाटी सह २९ ठिकाणी  हे छापे टाकले. याठिकाणी त्यांना अनेक संशयास्पद कागदपत्र, वस्तू तसाच रोख रकम मिळाली आहे.