जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय लष्करान उधळला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज पहाटे हाणून पाडला. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी उडवलेले एक क्वाडकॉप्टर पण नियंत्रण रेषेच्या पलीकडे दिसले तेव्हा त्यावर भारतीय लष्कराकडून गोळीबार करण्यात आला, त्यामुळे  ते मागे घेण्यात आले. G२० शिखर परिषद उधळण्याचा आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा आणखी एक प्रयत्न होता. दरम्यान, बारामुल्लाच्या घनदाट जंगल परिसरात दहशतवाद्यांसाठी व्यापक शोधमोहीम सुरू आहे.