फास्टॅग’ प्रणालीद्वारे एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा उच्चांक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘फास्टॅग’ प्रणालीद्वारे टोल अर्थात पथकर संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला असून एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा आजतागायतचा उच्चांक नोंदवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी एकाच दिवसात १ कोटी १६ लाखांहून अधिक व्यवहारांची ही उच्चांकी नोंद झाली. देशात टोल वसुली करण्यात ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी झाली असून त्यात सातत्यानं वाढ होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.१ जानेवारी २०२१ पासून देशात सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य आहे. ‘फास्टॅग’ कार्यक्रमांतर्गत शुल्क संकलन केंद्रांची संख्या आता ७७० वरून एक हजार २२८ पर्यंत वाढली आहे. तर ‘फास्टॅग’ वापरकर्त्यांची संख्या ६ कोटी ९० लाख झाली असून याचा प्रवेश दर सुमारे ९७ टक्के आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image