बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व भागातील राज्यात सागरी किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटावर तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसच बंगालच्या उपसागरात ताशी 40 ते 50  किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने छोटी जहाजे तसच मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.