संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी

 

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गावर आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टँकरमधल्या पाण्याची आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे. दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १८ ते २३ जून या कालावधीत सातारा जिल्हयामधून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळ्यासाठी सर्व सुविधा योग्य पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासह खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं. अशा सूचना साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिल्या.