सोडत अर्ज नोंदणीसाठी 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात येणार्‍या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केलं आहे. 

याव्यतिरिक्त कोणत्याही समाज माध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची किंवा इतर मध्यस्थांची मदत 'म्हाडा'तर्फे घेण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. काही समाजमाध्यमं नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत असल्याचंही निदर्शनाला आलं आहे.अशाप्रकारे प्राप्त झालेल्या व्हाट्सअॅप  ग्रुप्स अथवा संकेत स्थळावर जोडण्यासाठी प्राप्त झालेल्या लिंकवर सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये अशी सूचना त्यांनी केली आहे.  

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image