कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दीपक केसरकर, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत आणि अन्य मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हपुर आणि सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी पंचगंगा नदीपत्रातील गाळ काढण्याच्या तसंच प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया आणि अन्य उपाययोजना राबवण्याच्या सूचना शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.