सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयानं काल फेटाळला. विशेष न्यायाधीशांनी दिलेला पूर्वीचा आदेश गेल्या महिन्यात, मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आणि नवलखा यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी करण्याचे निर्देश दिले. 

नवलखा यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. आणि सुरुवातीच्या काळात नजरकैदेनंतर त्यांना एप्रिल २०२० मध्ये मुंबईजवळील तळोजा कारागृहात हलवण्यात आलं होतं. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी त्यांच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं त्यांना एका महिन्यासाठी नजरकैदेत हलवायला परवानगी दिली होती. नवलखा हे सध्या नवी मुंबईत वास्तव्याला आहेत.