महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची योजना सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात 8 लाख 7 हजार महिलांनी लालपरीतून प्रवास केला. त्यातून एसटी महामंडळाला तब्बल १ कोटी २२ लाख ९९ हजारांचे उत्पन्न मिळालं आहे. या योजनेनंतर महिलांच्या प्रवासात ४४ टक्के वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.