केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले असून, बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहचली. या विशेष कार्यक्रमासाठी जवळपास २०क्विंटल फुलांची आरास करण्यात आली आहे.

आज सुरूवातीला पुर्वेकडील आणि त्यानंतर पश्चिमेकडील दरवाजा उघडण्यात आला. केदारनाथच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले आहेत. या महिन्याच्या २२ तारखेला, अक्षय तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पोर्टल उघडून चार धाम यात्रेला राज्यात सुरुवात झाली होती.