संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राठोड यांच्या कार्यालयातले अधिकारी काम करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ड्रगिस्ट आणि केमिस्ट संघटनेनं केला आहे. हा भ्रष्टाचार कुठपर्यंत गेला हे आता समोर आल्याचं सांगत पटोले यांनी सरकारवर टीका केली. मंत्रालयातूनच पैसे मागितलं जाणं, ही गोष्ट चिंताजनक असल्याचंही पटोले यांनी  सांगितलं.