आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केलं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत चाललं आहे, तसंच आपत्तींचं स्वरूपही बदलत आहे त्यामुळे कोणतीही आपत्ती राजकीय किंवा भौगोलिक सीमांपुरती मर्यादित राहत नाही असं ते म्हणाले. या परिषदेत अल्पावधीतच ४० देश सदस्य झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आपत्ती व्यवस्थापनासाठी विकसनशील देशांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं.