H3N2 चा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी अजित पवार यांची मागणी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.  जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणी करता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचं ते म्हणाले. संपाबाबतही सरकारनं तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अहमदनगर आणि नागपूरमधे या आजारानं दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका रुग्णालयात दीडशेहून जास्त शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.