भविष्य निर्वाह निधीवर ८ पूर्णांक १५ दशांश टक्के व्याज देण्याची शिफारस

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज देण्याची शिफारस आज केली. यापूर्वी हा दर ८ पूर्णांक १ दशांश टक्के होता. अर्थ मंत्रालयानं मंजुरी दिल्यानंतर या व्याज दराची अधिसूचना निघेल आणि त्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.  अंदाजे ११ लाख लाख कोटी रुपयांच्या एकूण ठेवींवर यामुळं ९० हजार कोटी रुपयाचं व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.