उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर रहायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दोन हजार कोटी रूपये देऊन शिवसेनेचं चिन्ह विकत घेतल्याचा आरोप या तिघांनी त्यांच्या वक्तव्यातून केला होता. त्यानंतर शिवसेना नेता राहुल शेवाळे यांनी हा खटला दाखल केला.