ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या भारतीय वायूसेनेच्या लढाऊ युनिटचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी बनल्या आहेत. ग्रुप कॅप्टन शालिझा धामी या पश्चिम क्षेत्राच्या क्षेपणास्त्र स्क्वॉड्रनचे नेतृत्व करणार असल्याचं भारतीय वायूसेनेनं काल जाहीर केलं. धामी यांना २००३ मध्ये हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.