केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये धमकी तसंच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन त्यानं गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात  केला होता. त्यानं यापूर्वी १४ जानेवारी २०२३ रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.