जी २० अंतर्गत व्यापार आणि वित्त कार्यसमुहाच्या पहिल्या बैठकीला मुंबईत सुरुवात

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी २० अध्यक्षतेखाली व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या ३ दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. व्यापाराला होणाऱ्या अर्थपुरवठ्यातली तूट वाढते आहे. आशियायी विकास बँकेच्या अंदाजानुसार ही तूट २ लाख डॉलरपर्यंत गेली आहे. आता तूट कमी करण्याची ही वेळ असल्याचं उद्घाटन सत्रात केंद्रीय वाणिज्य सचिव सुनिल बर्थवाल म्हणाले. अनेक देशांना मंदीची समस्या भेडसावत आहे. बँकींग क्षेत्रही संकटात आहे, असंही ते म्हणाले. या बैठकीच्या अंतर्गत आज व्यापार वित्त या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुमारे १०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहे. दुपारी हे प्रतिनिधी वांद्रे-कुर्ला संकुलातल्या भारत डायमंड बोर्सला भेट देणार असून संध्याकाळी गेट वे ऑफ इंडियाला जाणार आहेत.