'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन आज कोल्हापूर इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव सरमाह यांच्या हस्ते झालं.  यावेळी बोलताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी म्हणाल्या की, “छत्रपती शाहू महाराजांचे शहर कोल्हापूर हे अशा प्रकारचं प्रदर्शन आयोजित करण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला आणि स्टॉल्सना भेट द्यावी, असं आवाहन मुखर्जी यांनी केलं. हे प्रदर्शन ८ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान पाच दिवसांसाठी रंकाळा तलाव गार्डन इथं सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे.