जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता जेहोवाज विटनेसेस या संघटनेच्या केंद्रांत त्यानं स्वतावरही गाळी झाडून घेतल्याची माहिती पोलीसांनी दिली. हिंसाचाराचे क्रूर कृत्य असल्याचं हॅम्बर्गचे माजी महापौर असलेले चांसलर ओलाफ शोल्झ म्हटलं आहे. जर्मनीत अलिकडच्या काही वर्षांत अनेकदा सामूहिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत तर सरकारला उलथून टाकण्याचा उद्देश असलेल्या सशस्त्र गटाच्या कट कारस्थानाचा सामना करावा लागला आहे.या पार्श्वभूमीवर वैयक्तिक बंदुक बालगण्यासंदर्भातील नियम अधिक कडक करण्यात आले असून यासंदर्भात अधिक कडक उपाययोजना करण्यात येणार आहे.