स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काढण्यात येणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये रामनवमीपासून ६ एप्रिल पर्यंतच्या काळात काढण्यात येणार आहे आणि या गौरव यात्रेची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीनं सावरकरांचा अपमान केला आहे, याच्या निषेधार्थ सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्रभर काढण्यात येईल आणि त्या माध्यमातून सावरकरांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे जाहीर करावे. केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस सोबत आहेत असा आरोप त्यांनी केला.