गहू उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं आपल्या बैठकीत हे सर्वेक्षण सादर केलं. हरियाणा आणि पंजाब इथं वेळेवर किंवा वेळे पूर्वी केलेल्या गव्हाच्या पेरणीपैकी ७५ टक्के क्षेत्र मार्च महिन्यात उन्हाळ्यामुळे प्रभावित होणार नाही, तसंच भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांनी हवामान बदलाचा सामना करू शकेल असं गव्हाचं वाण विकसित केलं आहे. असं समितीच्या सर्वेक्षणात  म्हटलं आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image