नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल - अब्दुल सत्तार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची पीक विम्याची  प्रलंबित रक्कम येत्या ३१ मे पर्यंत देण्यात येईल, अशी  ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत न कळवल्यामुळे काही शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं. पीक विम्या संदर्भातील जाचक अटी शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असंही सत्तार म्हणाले.