देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे - प्रधानमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान अमृत महोत्सवी वर्षात आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या विषयी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काढलेल्या गौरवोदगारांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री बोलत होते. देशातल्या महिलांच्या कामाबद्दल कौतुक करताना प्रधानमंत्री म्हणाले की, महिलांनी विविध क्षेत्रं  पादाक्रांत करणं, हा ‘नारीशक्तीच्या’ आत्मविश्वासाचा सकारात्मक परिणाम आहे.