संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ केला. गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधानसभेत अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दिली होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला होता. 

विधिमंडळाबाबत कोणीही असे उद्गार काढणं गैर आहे मात्र कारवाईपूर्वी राऊत यांचं म्हणणं तपासून पाहण्याची गरज आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मांडली. याप्रकरणी येत्या दोन दिवसात चौकशी करुन येत्या ८ मार्चला पुढचा निर्णय जाहीर करू अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

राऊत यांचे वक्तव्य अतिशय अपमानास्पद असून हा विधिमंडळ सदस्यांसह, संविधान आणि संपूर्ण राज्यातल्या नागरीकांचा अपमान आहे, असं नार्वेकर म्हणाले. विधानसभा सदस्यांच्या विशेषाधिकारांचं संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे.  या प्रकरणी  सखोल चौकशीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षांच्या या घोषणेनंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात येऊन गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानपरिषदेतही या मुद्यावरून गोंधळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज स्थगित झालं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image