बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 409 धावा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं आपला पहिला डावात आज दुसऱ्या दिवशी पुढं सुरु केला. कॅमेरॉन ग्रीनच्या शतकानंतर आता उस्मान ख्वाजा १८० धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ४०९ धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर उस्मान लगेच बाद झाल्यानं त्याची द्विशतकाची संधी हुकली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद ४३६ धावा झाल्या होत्या.