प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा प्रारंभ केला. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी दूर नियंत्रकाद्वारे केलं.

दाऊदी बोहरा समाजाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मरोळ इथल्या सैफी अकादमीच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटनही प्रधानमंत्री करणार आहेत. या मुंबई दौऱ्यासाठी आज दुपारी मोदी यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्यांचं स्वागत केलं.