सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना

 

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आईच्या चरणी नतमस्तक होतो. श्री देवीभराडी मातेचे आशीर्वाद घेतो. खरंतर आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला मला येण्याची संधी यापूर्वी मिळाली नाही. पण यावर्षी भराडी देवीमुळे मला आज येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आईचे मनापासून आभार मानतो. आई भराडी देवी आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद द्यावेत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य मिळावे. अशी आईच्या चरणी प्रार्थना केली.