कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून होतोय साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” हा कार्यक्रम आज दुपारी होणार आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचं अभिवाचन यामध्ये करण्यात येईल.