देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे केवळ २ लाख ३२ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने झाले होते. ती संख्या २०२१ - २२ मधे ७ लाखाच्या वर गेली देशभरात ८४ डिजिटल बँकशाखा सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या बँका २४ तास चालू असल्याने ग्राहकांना मोठी सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.