सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायमूर्तींचा शपथविधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची शपथ दिली. शपथ दिलेल्या न्यायाधिशांमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति पंकज मिथल, पटना उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति संजय करोल, मणिपुर उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति पीवी संजय कुमार, पटना उच्च न्यायालयाचे  न्यायाधीश, न्यायमूर्ति असानुद्दीन अमानुल्लाह आणि  अलाहाबाद उच्च न्यायालयाचे  न्यायाधीश, न्यायमूर्ति मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.