शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही निर्णय नाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटानं  निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याबाबत झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आले. याबाबत आज कोणताही निर्णय झाला नाही. येत्या वीस तारखेला पुढची सुनावणी होणार आहे.