बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन केलं आहे. इयत्ता चौथी ते इयत्ता सातवी मध्ये शिकणारे विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर या स्पर्धेत चित्र काढणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. या स्पर्धेला चित्रांजली असं नाव देण्यात आलं आहे. प्रसिद्ध चित्रकार डग्लस जॉन यांच्या हस्ते या चित्रकले स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.