कॅलिफोर्नियामध्ये रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेत वादळग्रस्त कॅलिफोर्नियामध्ये काल रात्रीपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानात भर पडली असून, पुरामध्ये अंदाजे १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडचा डोंगराळ भाग आणि आणि सॅन दिएगोच्या पूर्वेला येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसेल असा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागानं वर्तवला आहे.

कॅलिफोर्निया प्रशासनाच्या विनंतीची दाखल घेऊन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली आहे. वादळामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या तीन काऊंटीमध्ये आपत्ती निवारणाच्या कामासाठी  निधी उपलब्ध केला आहे. कॅलिफोर्नियामधल्या १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती  कॅलिफोर्नियाच्या आपत्कालीन सेवांनी दिली.