कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी २८ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.