शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- जयंत पाटील

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही, कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. नवे मित्र जोडण्याला कुणाचा विरोध नाही, मात्र मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं, जयंत पाटील यांनी नमूद केलं.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image